केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोचवा -  विक्रम सहाय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

 केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांनी सक्रियपणे काम करावे, असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. 

पुणे - केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांनी सक्रियपणे काम करावे, असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरोच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा या वेळी उपस्थित होते. 

सहाय म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचबरोबर जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून योजनांची माहिती द्यावी. तसेच योजनेच्या अंमलबजावणीच्या सद्य:स्थितीबाबत सरकारलाही अवगत करावे.’’ या वेळी राज्यातील अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी टॅबचे वितरण  करण्यात आले. 

दरम्यान, शहरातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पत्रसूचना कार्यालय आणि इतर विभागांचा समन्वय साधण्यासाठी मध्यवर्ती इमारतीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सहाय यांनी विभागीय आयुक्तालयाजवळील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या इमारतीची पाहणी केली. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यालयात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकार, जनसामान्य तसेच विद्यार्थांना माहिती देण्यासाठी माध्यम केंद्र आणि खुले सभागृह स्थापन करण्यात येणार असल्याचे सहाय यांनी सांगितले. बीएसएनएलचे प्रधान महाव्यस्थापक सुनीलकुमार, विपुल अग्रवाल, महाव्यवस्थापक पंकज मिश्रा, अधीक्षक अभियंता संजय श्रीवास्तव आदी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Release the plans of the Center to the public says vikram sahay

टॅग्स
टॉपिकस