

Lonavala waterfalls
लोणावळा - गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात पावसाची संततधार सुरू असून संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने खुलून गेला आहे. डोंगर-दऱ्यांवर दाट धुक्याची चादर पसरली असून हिरवागार निसर्ग, खळाळून वाहणारे ओढे-नाले आणि कडेकपाऱ्यांवरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना मोहिनी घालत आहेत.