Pune News : एनडीएच्या परेड मैदानावर ‘रिलायंट रॉबिन’ची अखेरची दौड; १३ व्या दीक्षांत संचलनानंतर होणार निवृत्त

एनडीएच्या ऐतिहासिक खेत्रपाल परेड मैदानावर गेल्या सहा वर्षांपासून लष्करी परंपरा, शिस्त आणि दिमाखाचे प्रतीक ठरलेला ‘रिलायंट रॉबिन’ हा अश्व आता निवृत्त होणार आहे.
The Adjutant’s horse, ‘Reliant Robin’, performing a salute during the passing-out parade.

The Adjutant’s horse, ‘Reliant Robin’, performing a salute during the passing-out parade.

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ऐतिहासिक खेत्रपाल परेड मैदानावर गेल्या सहा वर्षांपासून लष्करी परंपरा, शिस्त आणि दिमाखाचे प्रतीक ठरलेला ‘रिलायंट रॉबिन’ हा अश्व आता निवृत्त होणार आहे. एनडीएच्या अज्युटंटचा अश्व (चार्जर) म्हणून त्याने आतापर्यंत १२ दीक्षांत संचलनांमध्ये (पासिंग आऊट परेड) सहभाग घेतला आहे. येत्या २९ नोव्हेंबरला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दीक्षांत संचलनात तो अखेरची सलामी देणार असून, त्यानंतर त्याच्या प्रदीर्घ सेवेची सांगता होईल.

Loading content, please wait...