

Railways announce 44 special trips between Pune and Ghazipur to ease summer travel rush.
sakal
पुणे: उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे व गाझीपूर सिटी दरम्यान ‘विशेष शुल्कासह’ द्विसाप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ही रेल्वे गाझीपूरहून परतताना पुण्याऐवजी हडपसर स्थानकावर आपला प्रवास थांबवेल.