
PMRDA Land Records
Sakal
पुणे : वहिवाटीची मोजणी बंद केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्यांना मोजणी करून घेण्यासाठी येणाऱ्या अडचण दूर करण्याकरिता भूमी अभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना मोजणीसाठी अर्ज करण्यापूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’ने तात्पुरते रेखांकन कसे उपलब्ध करावे, यासाठीची कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यासाठी डिजिटल स्वरूपात जिओ रेफरन्सिंग असलेले हद्दीचे सर्व नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अर्जदारांना तात्पुरते रेखांकन करून देणे महापालिकेला सोयीचे होणार आहे.