

₹5,265-Crore Hadapsar–Yavat Elevated Corridor Moves Ahead with Soil Testing
sakal
पुणे: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) वतीने बहुचर्चित ‘हडपसर-यवत उन्नत मार्गा’च्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात उन्नत मार्गाचे जरी काम सुरू झाले नसले तरीही त्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या कामांनी मात्र वेग घेतला आहे. हडपसर -यवतदरम्यान दहाहून अधिक ठिकाणी माती परीक्षण केले जात आहे, तर लवकरच ‘युटिलिटी शिफ्टिंग’(सेवा वाहिन्यांचे स्थलांतर)चे काम हाती घेतले जाणार आहे. जानेवारी २७ पासून पिलरच्या कामाला सुरुवात होणार आहे.