
पुणे जिल्ह्याला दिलासा; नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक
पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची(pune corona update) संख्या मागील आठ दिवसांपासून झपाट्याने कमी होत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दररोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या कोरोना आकडेवारीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आठ दिवसांपूर्वी ९३ हजार ६४२ वर पोचलेली ही संख्या सोमवारी (ता.३१) साठ हजारांच्या आत आली आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ५९ हजार २०४ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत.
हेही वाचा: गोकुळ, केडीसीसह संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ; सहाव्यांदा पुन्हा स्थगिती
सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ३ हजार ७६२ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून, ७ हजार ९५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील नऊ, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक मृत्यू आहे. सोमवारी दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत एकही मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार ५६ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये ९३१. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५९७, नगरपालिका हद्दीत १४९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार २५३ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ९४२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार १९८, नगरपालिका हद्दीतील ३७८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १७२ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारी दिवसात २२ हजार ७६६ कोरोना चाचण्या(corona test) घेण्यात आल्या आहेत. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी २ हजार ३१७ रुग्णांवर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. उर्वरित ५६ हजार ८८७ जण गृहविलगीकरणात आहेत.
हेही वाचा: उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे दूध उत्पादक संघाची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर
क्षेत्रनिहाय एकूण सक्रिय कोरोना रुग्ण
पुणे शहर २९ हजार ९१७(pune corona update)
पिंपरी चिंचवड १७ हजार ४५९
जिल्हा परिषद कार्यक्षेत्र ९ हजार १३८
नगरपालिका क्षेत्र १ हजार ९२७
कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्र ७६३
जिल्हा एकूण ५९ हजार २०४
Web Title: Relief To Pune District More Corona Patienst Disease Than New Patients Pune Corona Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..