धर्म हा भारतीय सभ्यतेचा पाया - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राच्या bharatvidya या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSakal
Summary

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राच्या bharatvidya या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या.

पुणे - मानवी व्यवहारांतील जटिल प्रश्नांची उत्तरे ही धर्माच्या परीप्रेक्ष्यात मांडण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने धर्म हा प्राचीन भारतीय सभ्यतेचा पाया आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राच्या bharatvidya या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रदिप रावत, सर्वसाधारण सभेचे ॲड. सदानंद फडके, भूपाल पटवर्धन व संजय पवार उपस्थित होते. भारताचे प्राचीन ज्ञान सहा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून या संकेतस्थळावर लेख, पुस्तके, व्हिडिओ आदी स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे.

धर्माची व्याप्ती सांगताना सीतारामन म्हणाल्या, ‘आपल्या विविधतेतील एकतेची संवेदना या संस्कृतीत असून, वैश्विक प्रश्नांचा ऊहापोह धर्माच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कला, वास्तुशास्त्र, इतिहासापासून ते विज्ञानापर्यंतच्या तत्त्वज्ञानाने समृद्ध झालेल्या या संस्कृतीची अतुलनीय सेवा भांडारकर संस्थेने केली आहे.’

भांडारकर हे भारतीय प्रबोधनयुगाचे अपत्य असल्याचे मत रावत यांनी मांडले. ते म्हणाले,‘‘भारतचा सुवर्णकाळ भविष्यात येऊ घातला आहे. या विश्वासावर आम्ही काम करत असून, देशाची आधुनिक ओळख ही प्राचीन सभ्यतेच्या मुळाशी दडली आहे. या संस्कृतीतून मिळालेली एकता खऱ्या अर्थाने भारताचे शक्तिस्थळ आहे.’’ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भांडारकरच्या वतीने विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. ॲड. पटवर्धन यांनी प्रस्तावना तर ॲड फडके यांनी आभार मानले.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्याच परंपरेकडे स्वाभिमानाने पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राने संस्कृतीतील हे अमोघ ज्ञान सर्वसामान्यांना प्रादेशिक भाषेतून उपलब्ध करावे. जेणेकरून ग्रामिण भागातील लोकांनाही याचा फायदा होईल.

- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com