pune rural police
sakal
पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीच्या विविध गुन्ह्यांत जप्त केलेला दोन कोटी ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे ग्रामीण पोलिसांनी मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत केला. यामध्ये सुमारे २१८ तोळे सोने, सहा किलो चांदीचे दागिने आणि ४४ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. चोरीस गेलेला कष्टाचा ऐवज परत मिळाल्याने फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.