
Paragaon Police return 25 lost mobiles worth ₹4.75 lakh — citizens express gratitude for the honest service.
Sakal
-सुदाम बिडकर
पारगाव: पारगाव (ता. आंबेगाव) येथील पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने उल्लेखनिय कामगिरी करत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे चार लाख ८० हजार रूपयांचे गहाळ झालेले एकुण २५ मोबाईल फोनचा जलदगतीने शोध लाऊन ऐन दिवाळीच्या काळात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या हस्ते मुळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.