esakal | भाडेकराराची नोंदणी ‘हँग’
sakal

बोलून बातमी शोधा

online-registration

भाडेकराराची नोंदणी ‘हँग’

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायरी - उपनिबंधक कार्यालयाद्वारे भाडे करारनामा नोंद करणारी संगणक यंत्रणा गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाली आहे. या सॉफ्टवेअरमधील बिघाड दुरुस्त करण्यात तंत्रज्ञांना अजून तरी यश आलेले नाही. त्यामुळे ही सेवा केव्हा पूर्ववत होईल, हे कोणीही अधिकारी सांगू शकत नाही.

गेल्या महिन्यात २४ ऑगस्टला या सॉफ्टवेअरमध्ये पोलिस व्हेरिफिकेशन सुविधेचा समावेश करण्यात आला. या नव्या सुविधेमुळे भाडेकरार केल्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन व्हेरिफिकेशनची नोंद करण्याची गरज उरली नाही. थेट व्हेरिफिकेशन सुविधेमुळे महा-ई-सेवा केंद्र तसेच ऑनलाइन भाडेकरार नोंदणीचे काम करणाऱ्या काही खासगी व्यावसायिकांची मात्र चांगली सोय झाली आहे. अशा व्यावसायिकांकडील सेवा सुरू असून, उपनिबंधक कार्यालयांकडून भाडेकरार नोंदणीत अडथळे येत आहेत. भाडेकरार नोंदणीचे काम करणारे वकील कैलास थोरात म्हणाले, ‘‘भाडेकरार नोंदविण्यासाठी नोंदणी कार्यालयाच्या प्रणालीवर भाडेकराराची माहिती भरताना एके ठिकाणी भाडेकरूचा मूळ व सध्याचा पत्ता नोंदवावा लागतो. तो भरतेवेळी प्रणाली ठप्प होते व पुढील माहिती भरता येत नाही. आज सकाळीही हा अनुभव आला.’’

उपनिबंधक कार्यालयामार्फत राज्यातील भाडेकरार
१२ हजार ८१३ - जुलैमधील नोंदणी
१० हजार २६८  - ऑगस्टमधील दस्त
२८ पुण्यातील  - उपनिबंधक कार्यालये
५ ते ६ प्रत्येक कार्यालयात दररोज होणारे भाडे करार

भाडेकरार नोंदणीसाठी प्रथम पब्लिक डाटा एंट्री करून माहिती अपलोड झाली का, याची खात्री करावी व नंतरच नोंदणीसाठी जावे. अडथळ्यांबाबत ‘एनआयसी’ला तपासणी करण्यास सांगितले आहे.
-प्रकाश अहिरराव, नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक व माहिती तंत्रज्ञान).

पोलिस व्हेरिफिकेशन सुविधेचा समावेश केल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून ही यंत्रणा विस्कळित झाली आहे. यंत्रणा पूर्ववत करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
- पोपटराव भोई, उपनिबंधक, सिंहगड रोड कार्यालय

loading image
go to top