Pargaon News : घोडनदीवरील पुलाची दुरुस्ती करुन नवीन पुलाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा; अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जलसमाधी देऊ

या महिन्यात दोनदा घोड नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात लाखणगाव येथील पुलाचे नुकसान झाल्याने खबरदारी म्हणून हा पुल वहातुकीसाठी बंद करण्यात आला.
lakhangaon ghod river bridge bad condition

lakhangaon ghod river bridge bad condition

sakal

Updated on

पारगाव - लाखणगाव, ता. आंबेगाव येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील घोडनदीवरील नवीन पुलाचे अपूर्ण काम तातडीने सुरु करा. तसेच जुन्या पुलाची त्वरित दुरुस्ती करुन वहातुक सुरळीत करा. अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जल समाधी देऊ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com