कात्रज घाटातील धोकादायक कठड्यांबाबत अखेर... 

katraj ghat
katraj ghat
Updated on

खेड शिवापूर (पुणे) : कात्रज घाटातील तुटलेल्या संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. 'सकाळ'ने दिलेल्या वृत्ताने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली.

मोटार विहिरीत कोसळून महिलेसह दोन बालकांचा मृत्यू
 
कात्रज घाट रस्त्यावरील अनेक ठिकाणचे संरक्षक कठडे गेल्या एक वर्षापासून तुटले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसाने ठिकठिकाणी हे संरक्षक कठडे तुटून दुरवस्था झाली होती. विशेष म्हणजे घाट रस्त्यावर खोल दरी असलेल्या ठिकाणच्या रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यांना मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. तसेच, येथून प्रवास करताना प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली होती. 'सकाळ'ने याबाबतचे नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध केले होते. 

या घाट रस्त्यावरील संरक्षक कठड्यांची गेल्या एक वर्षांपासून दुरावस्था झाली होती. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत होते. मात्र 'सकाळ'ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कठड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. त्याबद्दल प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com