पोलिस आयुक्तालयातील तेरा निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तेरा पोलिस निरीक्षकांच्या सोमवारी (ता. २७) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून आयुक्त संदीप बिष्णोई यांनी या बदल्या केल्या आहेत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तेरा पोलिस निरीक्षकांच्या सोमवारी (ता. २७) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून आयुक्त संदीप बिष्णोई यांनी या बदल्या केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अधिकाऱ्याचे नाव व कंसात बदली झाल्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे - शंकर बाबर (वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी ते गुन्हे शाखा युनिट ३, अतिरिक्त कार्यभार एमओबी), राजकुमार शिंदे (वरिष्ठ निरीक्षक, चिखली ते वाहतूक शाखा), मिलिंद वाघमारे (निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी), सतीश माने (वरिष्ठ निरीक्षक, वाकड ते वरिष्ठ निरीक्षक, चिखली), विवेक मुगळीकर (निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-३ ते वरिष्ठ निरीक्षक, वाकड), राजेंद्र राजमाने (निरीक्षक, वाकड ते प्रभारी रावेत चौकी), गणेश जवादवाड (निरीक्षक, चिखली ते वरिष्ठ निरीक्षक, निगडी), राजेंद्र निकाळजे (निरीक्षक, निगडी ते निरीक्षक, पिंपरी), शहाजी पवार (संगणक विभाग ते निरीक्षक, तळेगाव दाभाडे), अरुण ओंबासे (निरीक्षक, वाहतूक विभाग, भोसरी ते निरीक्षक, वाहतूक विभाग, निगडी), शिवाजी गवारे (निरीक्षक, वाहतूक विभाग, आळंदी ते निरीक्षक, वाहतूक विभाग, भोसरी), देवराम चव्हाण (निरीक्षक, गुन्हे ते नियंत्रण कक्ष), सुनील टोणपे (वरिष्ठ निरीक्षक, निगडी ते निरीक्षक, निगडी).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Replacement of thirteen inspectors in the police commissioner