पुण्यात कोरोना बाधित एजंटच्या कुटुंबातील नऊ जणांचे रिपोर्ट.....

Report of nine members of Corona affected agent family is Positive in Pune
Report of nine members of Corona affected agent family is Positive in Pune

हडपसर : येथील रजिस्टर कार्यालयांमध्ये खरेदीखत करायला आलेल्या कोरोना बाधित एजंटच्या कुटुंबातील नऊ जण पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. तर दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्टार व त्यांचे कर्मचारी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

केरळच्या त्या हत्तीणीला पुण्याच्या या हरिणीचा हेवा वाटत असेल...

रजिस्टर कार्यालयामध्ये सुरवातीला एजंटला त्रास होत असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात तपासणी साठी दाखल केले. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह निघाल्याने निबंधक कार्यालयात एकच खळबळ सुरू झाली. महापालिकेने काळेपडळ येथे राहणार एजंट च्या घरातील बारा जणांना व तपासणी साठी ताब्यात घेतले होते. मंगळवारी सायंकाळी 12 पैकी नऊ जण पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे.  नऊ जणांना पालिकेने रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्टार व त्यांचे कर्मचारी असे चार जणांचा खाजगी रुग्णालयात तपासणी करण्यात अली. त्यांचा रिपार्ट निगेटिव्ह आला आहे. एजंटने आणखी किती जनांना संपर्क केला आहे याची माहिती घेण्यात येत आहे. एका व्यक्तीला लागण झाल्यानंतर तो घरी गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आल्यानंतर संपूर्ण कुटुंब बाधित झालेली ही तिसरी घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन शिथिलते कडे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

बारामतीत पार्टीसाठी हरणाची शिकार

हडपसर मुंढवा सहायक आयुक्त कार्यालयाचे सहायक आयुक्त सुनील यादव यांनी सांगितले,की काळेपडळ येथे एकाच कुटुंबतील नऊ जणांना लागण झाल्याचे रिपोर्ट मुळे समोर आले आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळेपडळ मध्ये महापालिकेच्या वतीने सर्वे द्वारे माहिती घेण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. सोशल डिस्टनसिंग , तोंडाला मास्क व विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन केले.

पुण्यात यायचंय? क्वारंटाइनसंदर्भात आहे मह्त्त्वाची बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com