पुरंदरमधील कोरोना रुग्णाच्या थेट संपर्कातील नऊजणांचे रिपोर्ट... 

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 26 मे 2020

पुरंदर तालुक्‍यातील श्री क्षेत्र वीर गावात 20 मे रोजी आढळलेल्या कोरोना संसर्ग रुग्णाच्या थेट संपर्कातील नऊजणांचा आज कोरोना चाचणीचा अहवाल...

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील श्री क्षेत्र वीर गावात 20 मे रोजी आढळलेल्या कोरोना संसर्ग रुग्णाच्या थेट संपर्कातील नऊजणांचा आज कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सील केलेल्या वीर व लगतच्या वाड्यावस्त्यांमधील चिंताग्रस्त गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही सर्वच गावांमध्ये अनेक अनिवासी गावकरी आल्याने काळजी मिटलेली नाही. 

खासदार अमोल कोल्हे यांची आदिवासींसाठी मोठी मागणी 

वीर गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबई कनेक्‍शनमधील आहे. हा रुग्ण मुंबई पोलिस दलात प्रशिक्षणार्थी होता. मुंबई च्या सांताक्रूझ येथील कलीना कॉलनीमधील तो रहिवासी असताना तिथे एक पोलिस पॉझिटिव्ह आढळला व काहींना त्रास सुरू झाल्यानंतर हा मूळचा वीरचा पोलिस घाबरून गावी आला व होम क्वारंटाइन असतानाच त्याची प्रकृती बिघडली. खासगी तपासणीत तो पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून (ता. 20) तो पुण्यात सरकारी रुग्णालयात दाखल आहे. आज त्याच्या संपर्कातील व सासवड कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात असलेले तब्बल नऊजण निगेटिव्ह ठरले आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

उरुळी कांचनमधील भर चौकात पोलिसाला टोळक्‍याकडून बेदम मारहाण 

याबाबत तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्‍यात वीर, सुपे व कोडीत या तीन गावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. संबंधित गावांपैकी वीर नऊ, सुपे खुर्द 17 व कोडीत बुद्रुकचे पाचजण, असे 31 जण विलगीकरणात कोविड केअर सेंटरला आहेत. बाकी विलगीकरणातील लोकांचेही पाठविण्यात येत आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report of nine people in direct contact with Corona patient in Purandar