बारामतीत पहिल्यांदाच संशयित रुग्णावर पीपीई किट परिधान करुन केले अंत्यसंस्कार; कोरोनाचा रिपोर्ट...

Report of suspected corona patient in Baramati is negative
Report of suspected corona patient in Baramati is negative

डोर्लेवाडी : तालुक्यातील डोर्लेवाडी येथील संशयित कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी दिली. दरम्यान काल रात्री नगरपालिकेच्या चार कर्मचाऱ्यांनी पीपीई किट परिधान करुन संबंधित रुग्णावर अंत्यसंस्कार केले. अशा प्रकारे पीपीई किट परिधान करुन अंत्यसंस्कार करण्याची बारामतीतील ही पहिलीच घटना होती.

 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोर्लेवाडीतील एका ज्येष्ठ नागरिकास त्रास होत असल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते, मात्र लक्षणे विचारात घेता संबंधिताने कोरोनाची तपासणी करुन घेण्याचा सल्ला त्याला दिला गेला. त्यानुसार रुई येथे त्यांच्या घशातील द्रावाचा नमुना तपासणी साठी घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी अहवाल येईपर्यंत रुई रुग्णालयातच राहावे, असे सांगण्यात आले होते, मात्र तेथे कोरोना बाधित रुग्ण असतात आपण तेथे राहणार नाही, त्या ऐवजी मला पुण्याला घेऊन चला, असे संबंधिताने सांगितल्यावर रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्याला नेण्यात येत होते, मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या घटनेनंतर संबंधित रुग्णाच्या तपासणीचा अहवाल आलेला नव्हता, त्यामुळे त्यास कोरोना संशयित म्हटले गेले होते. त्यांचे शवविच्छेदनही करता आले नसल्याने त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण गुलदस्त्यातच राहून गेले आहे. त्यांच्या मृतदेहावर नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार केले गेले. रात्री उशीरा त्यांच्या तपासणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले. प्राथमिक तपासणीमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह होता, मात्र सीआरपीसी तपासणीत मात्र त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला.
पुणे : बिबट्याने थेट मेढरांच्या कळपावरच घातला घाला; कोलवाडीत पळवले बकरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com