Pune News : चौतीस गावांसह स्वतंत्र महानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणे महापालिकेत समाविष्ट चौतीस गावांसह पूर्व हवेलीची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

हडपसर - पुणे महापालिकेत समाविष्ट चौतीस गावांसह पूर्व हवेलीची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन दिले आहे. आमदार राहुल कुल यावेळी उपस्थित होते.

हडपसर, महंमदवाडी, खराडी, वडगावशेरी, खडकवासला, सिंहगड रोड यांसह पुर्व हवेलीतील गावांची स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून होत आहे. फुरसुंगी व उरूळी देवाची या गावांच्या नगरपालिकेच्या निर्णयाने स्वतंत्र महानगरपालिकेच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबतची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

नुकतीच राज्यसरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळली असून या गावांची नगरपालिका करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यापूर्वी ऑक्टोंबर २०१७ ला अकरा गावांचा व जून २०२१ ला उर्वरित तेवीस गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र गावांत नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. त्याच गावांमधून अवाजवी कर आकारून करोडो रुपये गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे सातत्याने या गावातील नागरिकांची महापालिके सोबत संघर्षाची भूमिका राहिलीआहे. प्रचंड नाराजीही पाहायला मिळत आहे.

१९९७ मध्ये पुणे महापालिकेत छत्तीस गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळीही यातील काही गावे पुन्हा वगळली गेली. पुन्हा चौतीस गावांचा समावेश करण्यात आला. आता नुकतीच दोन गावे वगळली असून या दोन गावांना नगरपालिकेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. सध्या इतरही गावांमध्येही वातावरण तापले असून आमच्याही गावांचा समावेश नगरपालिकेत किंवा नवीन महानगरपालिकेत करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी काही गावातून ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत.

"लोकसंख्या व क्षेत्रफळाचां विचार करता राज्यातील सर्वात मोठी मनपा झाली आहे. तुलनेत सदस्य संख्या खूपच कमी आहे. पुणे पालिकेवर वाढता ताण पाहता पूर्व भागाची नवीन महापालिका करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तसे निवेदन दिले आहे. त्यांनीही याविषयी अधिक माहिती घेवून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगून या विषयासाठी सकारात्मकता दर्शविली आहे.'

- राहुल शेवाळे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com