उरुळी कांचन - महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पूर्व भागातील रिंगरोडच्या कामाला गावगुंडांचे ग्रहण लागले आहे. गाव गुंडाकडून रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना धमक्या दिल्या जात असल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या गाव गुंडामुळे बिवरी (ता. हवेली) येथील गोते मळा परिसराअंतर्गत रिंग रोडचे काम मजुरांनी थांबविले आहे.