Child Rescue : अल्पवयीन मुलगी मेंढपाळाच्या तावडीतून मुक्त, दोन वर्षांनंतर सुटका

Junnar News : जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली १० वर्षीय मुलगी पोलिस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सुटली; मेंढपाळाकडून जबरदस्तीने मेंढरं राखण्याचे काम करवले जात होते.
Child Rescue
Child RescueSakal
Updated on

ओझर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे वास्तव्यास असलेल्या मेंढपाळाने एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून आणून मेंढरं राखण्याच्या कामावर ठेवल्याचे नुकतेच उघडकीस आले. कर्तव्यदक्ष पोलिस प्रशासन व गावातील जागृत नागरिकांमुळे या मुलीची सुटका झाली. दोन वर्षांपासून कुटुंबापासून ताटातूट झालेली ही चिमुकली आता आपल्या घरी परतणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com