
शिरूर : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. यात अनेक मोठ्या गावांचे सरपंचपद खुले झाले असल्याने त्या गावांत जल्लोष झाला; तर सरपंच पदासाठी तलवारीला धार लावून बसलेल्या अनेक गावांचे सरपंचपद आरक्षित झाल्याने भल्याभल्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे या आरक्षण सोडतीतून 'कही खुशी कही गम' असे चित्र निर्माण झाले.