

Reserved voting machines found near Mohol
sakal
मोहोळ: मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी शनिवार ता 7 रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान मोहोळ शहरा जवळील एका धाब्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन मतदान यंत्र आढळल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. दरम्यान ही माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व शिंदे सेनेच्या काही कर्त्यांना मिळाल्या नंतर कार्यकर्त्यांनी घटना स्थळावर ठिय्या मांडला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोहोळचे निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस यंत्रणा तातडीने घटना स्थळावर दाखल झाली. जिल्हाधिकारी घटना स्थळावर आल्याशिवाय उठणार नाही असे सांगत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.दरम्यान प्रशासनाने ही मतदान यंत्रे राखीव असल्याचा दावा केला आहे.