मेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त 

जितेंद्र मैड
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस  विस्कळीत झाला असून  पुरेसं  पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली दोन वर्षे  साफ केलेली नाही. इमारतीच्या वरच्या टाकीतील पाणी झिरपून स्लॅबला गळती लागली आहे. वेळीच दुरूस्ती केली नाही तर, मोठी दुर्घटना होवू शकते. इमारतीमधील लिफ्ट गेले आठ वर्षे बंद असल्याने महिलांना सहा सहा मजले खाली उतरून पाणी वर न्यावे लागत आहे. पाईप लाईन खराब आहे. टाकीत उंदीर पडल्याने पाणी घाण झाले होते.

सुरेखा जाधव, कविता गुळेकर, किरण मोकाटे, संगीता जाधव, रेखा पवार, शोभा पवार, संगिता कुसाळकर आणि पन्नासहून अधिक महिलांनी यासंदर्भात तक्रार करुनही त्यांची तक्रार बिल्डरच्या प्रतिनिधींनी स्विकारली नाही. 

कुमार बिल्डर प्रतिनिधी राजेश भोईटे यांच्याशी संपर्क केला असता, ''नेमका काय प्रॉब्लेम आहे ते चौकशी करुन सांगतो'' ,असे सांगितले. त्यानंतर अनेक वेळा फोन करुनही फोन उचलला नाही. दरम्यान महिला शनिवारी दुपारी कुमार बिल्डरच्या कार्यालयात गेल्या होत्या. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नसल्याचे महिलांनी सांगितले. ​एसआरए कार्यालयात संपर्क केला असता ताबा विभागाचे अधिकारी सुकेश गोडगे यांनी सागिंतले की, ''सध्या या विभागाचा अॅडिशनल चार्ज माझ्याकडे आहे. परंतु यासंदर्भात मला पुरेशी माहिती नाही. योग्य माहिती घेवून कळवतो.  ''

''आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून तक्रार केली तरी अधिकारी व बिल्डरची माणसे दुर्लक्ष करत आहेत. येथील पाण्याची टाकी खराब झाली आहे. पाणी गळत असल्याने स्लॅबला धोका निर्माण झाला आहे. वायरींग नादुरुस्त झाले आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करुनही''
- सुरेखा जाधव, रहिवासी, मेगासिटी
 
''वीस वर्षे झाले आम्ही येथे राहतो. पण येथे कोणत्याही नागरी सुविधा व्यवस्थित नाहीत. पाणी आणण्यासाठी आम्हाला खाली यावे लागते. बिल्डरने आम्हाला अजून कागदोपत्री ताबा दिलेला नाही. बिल्डर स्वतः कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे आम्हाला येथे जगणे कठीण झाले आहे. तक्रार करुनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.''
- कविता गुळेकर, रहिवासी, मेगासिटी
 
''आमच्या इमारतीत काही दुर्घटना घडली तर अग्निशमन दल किंवा रुग्ण वाहीका येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. येथील इमारतींची दुरावस्था झाली असून बिल्डर जबाबदारी टाळत आहे.''
 - किरण सचिन मोकाटे, रहिवासी, मेगासिटी
 
''माझ्या पायात रॉड टाकलेला आहे. अशा परिस्थितीत मला पाणी आणण्यासाठी जीन्यांची चढ उतार करावा लागते. बिल्डरने व पालिकेने आमची पाण्याची व्यवस्था करावी.पाणी आणण्यासाठी आम्हाला खुप त्रास होत आहे. आम्हाला व्यवस्थित सुविधा द्यावी. आमच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यावर उपाय योजना करावी.''
- संगीता जाधव , रहिवासी, मेगासिटी

Web Title: Residents suffer Due to the bad condition of mega city