"हिंमत असेल तर राजीनामा द्या"; अमित शहांचं CM ठाकरेंना आव्हान

अमित शहा यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
Amit Shah
Amit ShahTeam eSakal

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात (BJP rally) त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करतना हिंमत असेल तर राजीनामा द्या, असं थेट आव्हान दिलं.

Amit Shah
"डॉ. आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही"

शहा म्हणाले, "पुणे ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. त्यांनी म्हटलं होतं की, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण शिवसेना म्हणते सत्ता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही ती मिळवणारच. आता एकवेळ तुम्ही मुख्यमंत्री बनलात. पण मी आजही म्हणतो जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपशी दोन हात करा. तुम्ही तिनही पक्ष एकसाथ लढायला या भाजपचा कार्यकर्ता तयारच बसलाय. महाराष्ट्राची जनता देखील हिशोब करायला तयारच आहे. अशा प्रकारचं सिद्धांतरहित राजकारण कोणत्याही राज्याच्या जनतेला मान्य नाही"

Amit Shah
शहांचं आंदोलनाच्या पावित्र्यातील शिवसैनिकांना थेट भेटीचं निमंत्रण

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालानं व्हायला हवी. लक्ष्य कधी कमी ठेऊ नका मित्रांनो. मी ऐकत होतो कोणी १०० तर कोणी १२० नगरसेवक असं म्हणतं होतं. पण जनता तुम्हाला जास्त नगरसेवक द्यायला बसली आहे, त्यामुळं मागण्यात कंजुषी करु नका. पुण्याची जनता फुलानं तुमचं स्वागत करायला तयार आहे. परिश्रम करा हे आपोआप होईल, अशा शब्दांत त्यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

Amit Shah
Photo Story : निवडणूक, शिवाजी महाराज-आंबेडकर; अमित शहांचा पुणे दौरा चर्चेत

मोदींनी डीबीटी केलं आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पण कॉंग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीनं याची नवी व्याख्या बनवली आहे. काँग्रेसनं 'डी' चा अर्थ डीलर लावलाय, शिवसेनेनं 'बी' पकडला असून त्याचा अर्थ ब्रोकर लावला तर राष्ट्रवादीनं 'टी'चा अर्थ ट्रान्सफर मनी असा लावलाय. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार याला डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात. त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला काय हवंय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवंय की डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर बिझनेस चालवणारं सरकार हवंय. जर हे सरकार नको असेल तर तस घरोघरी जाऊन लोकांना सांगा त्यांच्यापर्यंत मोदी, फडणवीस आणि चंद्रकांत दादांचा संदेश पोहोचवा, असं आवाहन यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com