Pune News : भाजपमधील वादावर तोडगा! पाच कोटींचा निधी पळविण्याचा ठराव अखेर रद्द

कासेवाडी-डायस प्लॉट प्रभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेला पाच कोटी रुपयांचा निधी स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात न घेता दुसऱ्या प्रभागात वळविण्यात आला होता.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on: 

पुणे - कासेवाडी-डायस प्लॉट प्रभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेला पाच कोटी रुपयांचा निधी स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात न घेता दुसऱ्या प्रभागात वळविण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधील नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झालेला होता. अखेर बुधवारी (ता. १८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव दप्तरी दाखल करत, भाजपमधील वादावर तोडगा काढण्यात आला आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात वृत्त देऊन हा विषय चव्हाट्यावर आणला होता.

Loading content, please wait...