Pune Airport: मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश! पुणे विमानतळाला 'जगद्गुरु संत तुकाराम महाराजां'चे नाव देण्याचा ठराव मंजूर
Pune Airport News: मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पुणे विमानतळाला 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज' यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला आहे.
पुणे विमानतळाला 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज' यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. पुण्याचे खासदार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नामकरणासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.