Cm Devendra Fadnavis : काँग्रेसच्या ‘फेक नरेटिव्ह’ला जशास तसे उत्तर द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ‘फेक नरेटिव्ह’ उभे करून काँग्रेसने वातावरण कलुषित केले.
cm devendra fadnavis and rahul gandhi

cm devendra fadnavis and rahul gandhi

sakal

Updated on

पुणे - लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ‘फेक नरेटिव्ह’ उभे करून काँग्रेसने वातावरण कलुषित केले. आता पुन्हा एकदा ‘फेक नरेटिव्ह’ची फॅक्टरी सुरू झाली असून, ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण सुरू आहे. या खोट्या प्रचाराला भाजप कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमे आणि युवा शक्तीच्या माध्यमातून आक्रमकपणे जशास तसे उत्तर द्यावे. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्हाला कमजोर समजू नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला देत कार्यकर्त्यांनाही आगामी राजकीय लढाईसाठी सज्ज केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com