जर्मन चित्रपटास ‘पिफ’मध्ये प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जर्मनीत आजही जुने लोक जातिभेद, उच्च-नीचता मानणारे आहेत. मात्र, तरुण पिढी त्यामानाने बरीच मोकळी आहे, ती बाहेरून येणाऱ्यांना स्वीकारत आहे, अशी भावना अभिनेत्री ज्युलिया फ्रान्झ्स्के यांनी व्यक्त केली.

पुणे - जर्मनीत आजही जुने लोक जातिभेद, उच्च-नीचता मानणारे आहेत. मात्र, तरुण पिढी त्यामानाने बरीच मोकळी आहे, ती बाहेरून येणाऱ्यांना स्वीकारत आहे, अशी भावना अभिनेत्री ज्युलिया फ्रान्झ्स्के यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ‘द टीचर’ चित्रपटासंबंधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चित्रपटाबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘ही कथा स्थलांतरित होऊन जर्मनीत नव्याने येणाऱ्या लोकांना भाषेसंदर्भात येणाऱ्या अडचणी, ती शिकून घेण्यासाठी होणारा संघर्ष आणि शिक्षकाची शिकविण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धती यावर हा चित्रपट आहे.’’  

जर्मनी हा देश युरोपातील अन्य देशांपेक्षा सांस्कृतिक व भाषेच्या दृष्टीने फार वेगळा देश आहे, त्यामुळे स्थलांतरित होऊन बाहेरून येणारे लोक त्यात लवकर समयोजित होऊ शकत नाहीत. अशाच एका स्थलांतरित मुलाची भाषा शिकण्याची धडपड म्हणजे हा चित्रपट असल्याचे ज्युलिया यांनी सांगितले. लिझाज टेल या चित्रपटाबाबत निर्माता वलेरी काल्मिको म्हणाले, ‘‘डाउन सिंड्रोम असलेल्या विशेष मुलांवरील लिझाज टेल हा चित्रपट आहे. अशा मुलांसाठी हे जग योग्य नाही अशी दिग्दर्शकाची भावना असून, या जगात त्यांना आनंद, प्रकाश मिळू शकेल का, याचा शोध घेणारा हा चित्रपट आहे.’’ दिग्दर्शक अलेक्‍झांडर हे स्वतः डाउन सिंड्रोम असलेल्या विशेष मुलांच्या शाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून गेली अनेक वर्षे काम करतात. त्यांनी अनुभवावर कादंबरी लिहिली असून, त्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to German film Piff