esakal | पुरंदरमधील या ४९ शाळांचा निकाल शंभर टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

result

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी पुरंदर तालुक्यातील सुमारे ६५ विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. २९४२ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी २८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल ९८.४६ टक्के एवढा लागला आहे. तर, ६५ पैकी सुमारे ४९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

पुरंदरमधील या ४९ शाळांचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By
तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी पुरंदर तालुक्यातील सुमारे ६५ विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. २९४२ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी २८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल ९८.४६ टक्के एवढा लागला आहे. तर, ६५ पैकी सुमारे ४९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

राज्यात दहावीचा निकाल 95 टक्केे

शंभर टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची नावे पुढीलप्रमाणे : एम.ई.एस. वाघीरे हायस्कूल सासवड, कर्मवीर विद्यालय परिंचे, पंचक्रोशी शेतकरी व तांत्रिक विद्यालय वाघापूर, शंकराव ढोणे विद्यालय गराडे, श्री. शिवाजी विद्या मंदीर आंबळे, अॅग्रो इंडस्ट्रीज विद्यालय चांबळी, डॉ. एस. कोलते विद्यालय पिसर्वे, पारेश्वर विद्यालय पारगाव मेमाणे, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे, न्यू इंग्लिश स्कूल पांगारे, यशवंत विद्यालय मावडी कडेपठार, न्यू इंग्लिश स्कूल मांडकी, श्री. भुलेश्वर विद्यालय माळशिरस, श्री. सिद्धेश्वर विद्यालय नायगाव, महर्षी वाल्मिक विद्यालय कोळविहिरे, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे, श्री. शिवशंभो विद्यालय एखतपूर मंजवडी, माध्यमिक विद्यालय मांढर, श्री. केदारेश्वर विद्यालय काळदरी, नागेश्वर विद्यालय नाझरे कडेपठार, डॉ. पतंगराव कदम विद्यालय दौंडज, माध्यमिक विद्यालय यादववाडी, कानिफनाथ विद्यालय भिवरी, श्री भैरवनाथ विद्यालय वनपुरी, मातोश्री जिजाऊ सोपानराव जाधव विद्यालय साकुर्डे, मावडी पिंपरी हायस्कुल पिंपरी, हरणी माध्यमिक विद्यालय, जिजामाता हायस्कूल जेजुरी, आदर्श माध्यमिक विद्यालय केतकावळे, न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन, न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन, न्यू इंग्लिश स्कूल गुऱ्होळी, श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद, हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी, सदगुरु नारायण महाराज विद्यालय नारायणपूर, राजे शिवराय विद्यालय पानवडी, श्री. बी. एस. काकडे विद्यालय पिंपरे, गुरुवर्य नारायण महाराज विद्यालय हिवरे, वाघेश्वर माध्यमिक विद्यालय पिंगोरी, राजुरी माध्यमिक विद्यालय, सदगुरु कानिफनाथ विद्यालय बोपगाव, शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल सासवड, पुरंदर पब्लिक स्कूल जेजुरी, गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल पुरंदर, अनुजाती व नवबौध्द मुलांची निवासी स्कूल, जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल जेजुरी, शारदा इंग्लिश मिडियम स्कूल वाघापूर, इंदू इंग्लिश मिडियम स्कूल कोळविहिरे, श्रीनाथ एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम स्कूल वीर.

पुण्यातील 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

इतर विद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे : महात्मा गांधी विद्यालय नीरा (९७.८७), पुण्य़श्लोक अहल्यादेवी विद्यालय जेजुरी (९२.२०), महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे (९७.७७), पुरंदर हायस्कूल (९१.०१), रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर (९३.३३), महात्मा फुले विद्यालय शिवरी (९८.४३) ,बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर (९७.२२), कोताबा हायस्कूल दिवे (९८.६१), लीलावती आर. एस. गर्ल स्कूल (९६.६६), कन्या प्रशाला सासवड (९७.६१), न्यू इंग्लिश स्कूल जेऊर (९५.८३), माहूर माध्यमिक विद्यालय (९७.०५), दादा जाधवराव विद्यालय जुनी जेजुरी (९५.६५), रिसे- पिसे माध्यमिक विद्यालय रिसे (९५.८३), संत सोपानकाका हायस्कूल (९६.९३), महात्मा फुले विद्यालय पुरंदर (८५.७१).

पुणे जिल्हा मुध्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भगवंत बेंद्रे, शिक्षक संघाचे अध्यक्ष इस्माईल सय्यद, शिक्षक नेते कुंडलीक मेमाणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे 
अभिनंदन केले.