वारज्यातील वनक्षेत्राला मिळणार ‘संजीवनी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

warje

वारजेतील वनक्षेत्राला मिळणार ‘संजीवनी’

पुणे : वारजे येथील डुक्कर खिंडीतील वन विभागाच्या ३०.३३ हेक्टरच्या राखीव क्षेत्रात ‘संजीवन वन उद्यान’ साकारण्यात येणार आहे. स्थानिक प्रजातींची झाडांसह बांबू लागवड, पाणवठे, फुलपाखरू उद्यान, ऑक्सिजन पार्क हे या उद्यानाचे अनोखे वैशिष्ट्ये असणार आहे.

वन विभाग आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथे ‘संजीवन वन उद्यान’ विकसित केले जाणार आहे. येत्या तीन वर्षात पुणे शहर व जवळपास असणाऱ्या नागरिकांसाठी पर्यटनाचे आणखी एक केंद्र उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: आंबिल ओढा प्रकरण; अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार

या वन उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२०) सकाळी सात वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, सुनील तटकरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) राहुल पाटील यांनी दिली.

उद्यान प्रकल्पाबाबत :

-संजीवन वन परिसर सध्या मोनोकल्चर प्रकार ग्लिरिसिडीया वृक्ष लागवडीने व्यापलेला आहे.

-ही एकसुरी वाढ काढून, स्थानिक वृक्ष प्रजातीचे ३३ हजार वृक्षांची लागवड केली जाणार

- ३० हेक्टरपैकी १० हेक्टर वन क्षेत्रामध्ये संजीवन वन प्रकल्प साकारण्यात येणार

- पाच नैसर्गिक पानवठ्याची निर्मिती

- विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देता येणार

- भूगर्भ पाणीसाठ्यात वाढ करणार

- प्रस्तावित प्रकल्पासाठी एकूण पाच कोटींचा खर्च

- प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण होणार

हेही वाचा: स्वयंपाकघराला महागाईच्या फोडणीचा ठसका! गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल

शाश्वत नियोजन:

वर्षाला साधारण १० ते १५ लाखांपर्यंत महसूल प्राप्त होईल

- वृक्ष मित्र, निसर्ग प्रेमी गटांची स्थापना करणे

- वनांच्या देखभालीतून रोजगार निर्मिती

- जैवविविधतेच्या वाढीवर भर दिला जाणार

- नागरिकांना व्यायाम करण्यासाठीची जागा आणि वनाची माहिती

- वनाच्या देखभालीसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक.

Web Title: Resuscitation To Be Given To Forest Area In Warja

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsWarje