esakal | निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शरद अवस्थी यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

awashti

 निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शरद नारायण अवस्थी (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले.

निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शरद अवस्थी यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शरद नारायण अवस्थी (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. 

अवस्थी हे पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. शहर पोलिस दलात त्यांनी वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक असताना सोनसाखळी चोरीचे तब्बल 75 गुन्हे त्यांनी उघडकीस आणले होते.

विशेष सुरक्षा पथकानंतर ते गुन्हे शाखेत सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. सोलापुरमध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यानंतर ते पुण्यात विशेष शाखा व गुन्हे शाखेत सहाय्यक पोलिस आयुक्त असताना निवृत्त झाले. विविध क्षेत्रातील लोकांशी दांडगा संपर्क व मनमिळावूपणामुळे त्यांच्याकडून क्‍लिष्ट गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याची हातोटी होती.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image