आता शरीरावर खाकी वर्दी नसेल, पण ह्दयात मात्र कायम खाकी वर्दीच असेल ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता शरीरावर खाकी वर्दी नसेल, पण ह्दयात मात्र कायम खाकी वर्दीच असेल!

आता शरीरावर खाकी वर्दी नसेल, पण ह्दयात मात्र कायम खाकी वर्दीच असेल!

पुणे : "पोलिस दलामध्ये सेवा करण्याची मला संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. वैयक्तीक आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण पोलिस दलातील नोकरीने त्या प्रत्येक संकटाला निधड्या छातीने सामोरे जाण्याचे बळ दिले. नेहमी कुटुंबापासून दूर राहून समाजाची सेवा बजावताना खाकी वर्दी अंगावर असल्याचा कायम अभिमान वाटत होता. आता अंगावर खाकी वर्दी नसली, तरी ह्दयात मात्र कायम खाकी वर्दीचे बळ असेल.'' ही भावना आहे, अनेक वर्ष पोलिस दलात सेवा रुजु करुन निवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची. हिच भावना 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात होती.

शहर पोलिस आयुक्तालयातील 19 पोलिस अधिकारी, अंमलदार, लिपीक, चतुर्थश्रेणी कर्मचारी शुक्रवारी सेवानिविृत्त झाले. त्यानिमित्त शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरीक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ.जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे यांच्यासह पोलिस उपायुक्त व अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांना या खास कार्यक्रमासाठी आमंत्रीत करण्यात आले होते. पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान होताना त्यांच्या पत्नी, मुले, नातवंडांच्या चेहऱ्यावर एकीकडे आनंद होता.

तर दुसरीकडे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डोळे पाण्याने ओलावले होते. आता उद्यापासून खाकी वर्दी, त्याचा रुबाब असणार नाही, या भावनेने अनेकांना गहिवरुन आले. या कार्यक्रमानंतर पोलिस पथकाचे संचलन झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी व सहकाऱ्यांकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.

" पोलिस दलात अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावून पोलिस अधिकारी, कर्मचारी निवृत्त होतात. मात्र त्यानंतरही त्यांच्यातील पोलिस हा कायम असतो. सर्वसामान्य नागरीक म्हणून समाजात वावरताना पोलिस दलात पार पाडलेले कर्तव्य पुन्हा एकदा पार पाडण्याची संधी मिळते.''

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

Web Title: Retired Police Officers And Staff No Longer Police Uniform On Body But Permanent Police Uniform In Heart Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top