esakal | मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

rain.jpg

नैर्ऋत्य मोसमी वाऱयांनी (मॉन्सून) सोमवारपासून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांमधून तो परत फिरला आहे. त्याच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून परतीचा प्रवास पूर्ण होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱयांनी (मॉन्सून) सोमवारपासून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांमधून तो परत फिरला आहे. त्याच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून परतीचा प्रवास पूर्ण होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॉन्सूनचा परतीचा प्रवास एक सप्टेंबरपासून सुरू होतो. मात्र, हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होणे अपेक्षित होते. त्यामुळे काही प्रमाणात हा प्रवास लांबल्याची स्थिती दिसत होती. आता दहा दिवसानंतर त्याने आजपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. 
मॉन्सून केरळमध्ये एक जूनला दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात ११ जूनला हजेरी लावली. त्यानंतर मराठवाड्यातील दक्षिण भागातून उत्तरेकडे सरकून प्रवास वेगाने सुरू झाला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात संपूर्ण मॉन्सून व्यापल्यानंतर १४ जूननंतर उत्तरेकडे कूच केली होती. अवघ्या दहा दिवसात मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापून बारा दिवस आधीच वायव्य भागात २४ ते २५ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता. पूर्व बिहारपासून ते बंगालच्या उपसागराच्या आंध्र प्रदेश किनारपट्टीपर्यंत चक्राकावर वाऱयाची स्थिती निर्माण झाली आहे. हे परतीच्या प्रवासास पोषक वातावरण असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.