Aagakhan Place and Shaniwarwadasakal
पुणे
Pune News : पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचे रूपडे पालटणार
शनिवारवाडा, आगाखान पॅलेसच्या सौंदर्यात चढतोय रंगीबेरंगी फुलांचा साज.
पुणे - शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस या ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य अधिकाधिक खुलविण्यासाठी आता देशी-परदेशी रंगीबेरंगी फुलांचा साज या वास्तुंमधील उद्यानांमध्ये चढविण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणांच्या उद्यानांमध्ये हंगामी फुले, झाडांना आकर्षक रंगरंगोटी आणि पुरातन चित्र जतन करण्यावर भारतीय पुरातत्त्व विभागाकडून भर दिला जात आहे.