पुणे - भारताच्या मध्यकालीन इतिहासात शनिवारवाड्याचे योगदान मोठे आहे, पेशवाईच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे देशभरातून दरवर्षी लाखो पर्यंटक येथे भेट देतात. पुरातत्त्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना अधिक समृद्ध अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पुण्यातील इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, असे केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज (ता. ५) सांगितले.