काय सांगता? आता सातबारा उतारा मिळणार स्मार्ट फोनवर; करा हे अॅप डाऊनलोड

Revenue Department launches Mahabhumi App for Satbara Utara
Revenue Department launches Mahabhumi App for Satbara Utara
Updated on

पुणे : सातबारा उतारा पाहायचा आहे.. तो खरा आहे की खोटा आहे यांची तपासणी करावयाची आहे.?. एवढेच नव्हे तर तुम्ही जेथे असला तेथे तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा हवा आहे... मग काळजी करू नका. आता या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात अर्थात मोबाईलमध्ये असणार आहेत. कारण महसूल विभागाने स्वत:चे मोबाईल ऍप तयार केले आहे. हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरून या सर्व गोष्टी करणे शक्‍य होणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध सुविधा ऑनलाइन करण्यावर महसूल विभागाने भर दिला आहे. यापूर्वीच ई-फेरफार हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत ऑनलाइन सातबारा उतारा, फेरफार उतारा , आठ "अ' चा खाते उतारा आदी सुविधा ऑनलाइन पुरविल्या जातात. त्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतार ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील खात्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या सर्व सुविधांसाठी महाभूमी पोर्टलवर जावे लागते त्यासाठी प्रत्येकाकडे संगणक किंवा लॅपटॉप असेलच असे नाही या अडचणीवर मात करण्यासाठी महसूल विभागाने स्वताचे महाभूमी हे मोबाईल ऍप तयार करायचा निर्णय घेतला आहे . या ऍप च्या माध्यमातून या सुविधा आता नागरिकांच्या हातात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी

महसूल विभागाकडून तयार करण्यात येत असलेले हे ऍप प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील सहा तालुक्‍यांतमध्ये टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिले आहे . त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍याचा समावेश आहे. या टेस्टिंग व्हर्जन मधील काही त्रुटी दूर करून लवकरच हे मोबाईल ऍप सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सातबारा उतारा आता खऱ्या अर्थाने खातेदारांच्या मुठीत येईल. 

या ऍपचे काय फायदे - 
1) विनास्वाक्षरीत सातबाराची माहिती पाहण्यासाठी संगणकाची गरज नाही 
2) 15 रुपये शुल्क भरून डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळणार 
3) सातबारा उताऱ्यावरील क्‍युआर कोड स्कॅन करून काही क्षणात त्याची पडताळणी करता येणार 
4) लवकरच अन्य सुविधा देखील या ऍपवर उपलब्ध होणार 


''महसूल विभागाकडून स्वत:चे ऍप तयार करत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते सहा तालुक्‍यां मध्ये टेस्टिंग साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पहिल्या टप्यात फक्त सातबारा उतार पाहणे व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतार शुल्क भरून काढता येणार आहे. लवकरच ई-रेकॉर्ड,ई-हक्क प्रणाली, आपली चावडी, डिजिटल भू-नकाशे आदी सुविधा देखील या ऍपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे महसूलचे सर्व अभिलेख सामान्य माणसाच्या मुठीत उपलब्ध असतील असा शासनाचा प्रयत्न आहे''
- रामदास जगताप (उपजिल्हाधिकारी तथा राज्याचे ई फेरफार प्रकल्प समन्वयक) 

शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी

-राज्यात एकूण 2 कोटी 25 लाख सातबारा उतारा 
-त्यापैकी 2 कोटी 49 लाख डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com