पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी महसूल मंत्र्यांनी केल्या 'या' सूचना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मालेगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. याचा उपयोग पुणे शहरासोबतच विभागात परिस्थितीनिहाय उपयोगी पडेल का? याबाबत माहिती घ्या. तसेच, सामूहिक संसर्ग होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना महसूल मंत्री

पुणे : मालेगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. याचा उपयोग पुणे शहरासोबतच विभागात परिस्थितीनिहाय उपयोगी पडेल का? याबाबत माहिती घ्या. तसेच, सामूहिक संसर्ग होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी महसूल मंत्री थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
थोरात म्हणाले, कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर नक्की मात करु. सरकारने लॉकडॉऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु केल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला कोरोनासोबत जगण्याबरोबरच मोठी लढाई लढावी लागणार आहे. माॅ्न्सूनच्या काळात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता योग्य नियोजन करुन रुग्णसंख्या कमी करण्याबरोबरच मृत्यूदराचा आलेख शून्यावर आण्यासाठी सर्वांना एकत्रित काम करावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि शारिरीक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो.

कोरोना उपचारासंदर्भात खर्चाची माहिती, प्रतिबंधित क्षेत्रात सरकारच्या निर्देशाचे पालन होत आहे का, तसेच विभागातील चाचण्यांची सद्यस्थिती, उपलब्ध बेड्स, रुग्णवाहिका याबाबत थोरात यांनी माहिती घेतली.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांबाबत माहिती दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Minister instructs administration to stop corona in Pune