बंधाऱ्यात पोहताना महसुल कर्मचारी बुडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue officer drowned at Varve

बंधाऱ्यात पोहताना महसुल कर्मचारी बुडाला

नसरापूर - वरवे खुर्द, ता. भोर तेथील लघु पाटबंधारे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या महसुल कर्मचारयाचा पोहताना दमछाक झाल्याने बुडाल्याची घटना घडली. मुकुंद त्रिंबक चिरके (वय ३५) रा. नसरापूर मुळगाव माजलगाव, जि. बीड असे बुडालेल्या व्यक्ती चे नाव असुन ते भोर तहसीलदार कार्यालयात दाखला कारकुन म्हणून कार्यरत होते.

चिरके त्यांचे मित्रांसमवेत रोज या तलावात पोहण्यासाठी जात होते. नेहमी प्रमाणे आज सकाळी सात वाजता दोन मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेले असताना मी पोहत पलीकडच्या किनाऱ्यावर जावून येतो, असे म्हणून पाण्यात पोहत गेले परंतु पाण्यात मध्यभागी गेल्यावर त्यांची दमछाक झाली हात वर करुन आपल्या मित्रांना मदतीसाठी आवाज दिल्यावर मित्रांनी तातडीने किनाऱ्यावरील साधी वल्हवण्याची बोट घेऊन तिथे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना आवाज देऊन आम्ही येतोय तुम्ही घाबरून जाऊ नका, असे सांगत असताना त्यांच्या पर्यंत पोहचण्याच्या अगोदर ते बुडाले. परिसरातील स्थानिक तरूणांनी देखील त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु पाणी खोल असल्याने यश येऊ शकले नाही.

भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील मंडल अधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली,विद्या गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, सहायक फौजदार उमेश जगताप व महसूल कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथकाच्या वतीने पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले असुन दुपारी एक वाजे पर्यंत त्यांचा तपास लागला नव्हता.

Web Title: Revenue Officer Drowned At Varve

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top