
हडपसर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व सद्गुरु संत तुकाराम महाराज या दोन्हीही संतांचा पालखी सोहळा एका मागोमाग एकाच दिवशी हडपसर मधून प्रस्थान ठेवत असतो. त्यांना निरोप देण्यासाठी शहरासह राज्याच्या विविध भागातील भाविक येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात. सोहळ्यातील वारकऱ्यांसह येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही, यासाठी अधिकाधिक चांगल्या सुविधा दिल्या जाण्याबाबतच्या सूचना आमदार चेतन तुपे पाटील यांनी स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.