जिल्ह्यात भाताच्या ५,८६१ हेक्टरवर रोपवाटिका -------------

जिल्ह्यात भाताच्या ५,८६१ हेक्टरवर रोपवाटिका -------------
Published on

भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

उघडिपीमुळे वेळेवर लागवडीची आशा; समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : भात पट्ट्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मागील आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने भात लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात भात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर रोपवाटिका तयार केल्या असून आतापर्यंत ५ हजार ८६१ हेक्टरवर रोपवाटिका झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास भात लागवडी वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
यंदा शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून खरीप हंगामाची तयारी सुरू केली होती. मात्र, जूनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने भात लागवडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १७६.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ७१.६ मिलिमीटर (४१ टक्के) पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकण्यास विलंब केला.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरणासह काही भागांत चांगला पाऊस झाला. त्यानंतर ९ जुलैपासून पावसाने उघडीप दिल्याने रोपवाटिकांची वाढ चांगली झाली आहे. साधारण २० ते २५ दिवसांत भाताची रोपे लागवडीस तयार होत आहे.
जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ६१ हजार १०१ हेक्टर आहे. यंदाही सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात लागवड होण्याचा अंदाज असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे सुमारे सहा हजार हेक्टरवर रोपवाटिका झाल्या होत्या. टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसामुळे भात लागवडी वेळेत पूर्ण झाल्या होत्या.

चौकट
भात रोपवाटिकांचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका -- भात लागवडीचे क्षेत्र -- रोपवाटिकेचे क्षेत्र
मावळ -- १२,९५० -- १,२४२
जुन्नर -- ११,१२९ -- १,०९०
खेड -- ७,७५० -- ७३३
मुळशी -- ७,६६० -- ७५२
भोर --- ७,५०० -- ७३०
आंबेगाव -- ५,७३७ -- ६२०
वेल्हे -- ५,०२५ -- ५००
हवेली -- २,०६४ -- १८९
पुरंदर -- १,२८६ -- ५
एकूण -- ६१,१०१ -- ५,८६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com