रिक्षाचालकास बांबूने मारहाण करुन खुन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder news

आर्थिक व्यवहाराच्या कारणातून रिक्षाचालकाला लाकडी बांबू व दगडाने मारहाण करुन खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रिक्षाचालकास बांबूने मारहाण करुन खुन

पुणे - किरकोळ आर्थिक व्यवहाराच्या कारणातून रिक्षाचालकाला लाकडी बांबू व दगडाने मारहाण करुन खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील माळवाडी येथे घडली. रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत सागर राहुल गायकवाड ( वय 24, रा. 15 नंबर चौक लक्ष्मी माता मंदिर गुरुदत्त मेडिकलच्या मागे हडपसर ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी कृष्णा विठ्ठल रखले ( वय 27, रा. कवडे गाव टोल नाका लोणी काळभोर ता. हवेली, हडपसर ) यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत युवकाची बहिणी अक्षदा प्रतीक वाघमारे ( वय 22, रा. शांती सागर वसाहत, बनकर कॉलनी आकाशवाणी समोर हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सागर गायकवाड व आरोपी कृष्णा रखले हे दोघे रिक्षाचालक होते ,दोघांची रविवारी सकाळी किरकोळ कारणावरून कवडी पाठ टोल नाका शेजारी भांडणे झाली होती. यानंतर दोघेही शांत झाले होते.

मात्र रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी कृष्णा रेखले यांनी माळवाडी येथील केशव चौक येथे दारू पिण्याच्या बहाण्याने त्याला बोलावून घेतले. त्या वेळेस रेखले हा रिक्षा मधून आला आणि सागरला लाकडी बांबू व दगडाने तोंडावर व डोक्‍यावर ठेचून गंभीर जखमी करून पळून गेले. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, घटनांस्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी उपचारा पूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे व तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून,आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला गजाआड केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.