esakal | पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन रिक्षाचालकाने केला पत्नीचा खून; नंतर स्वत: केली आत्महत्या

बोलून बातमी शोधा

Crime_Couple}

याप्रकरणी कोरेची दुसरी पत्नी जगदेवी कोरे (वय ३८) हिने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन रिक्षाचालकाने केला पत्नीचा खून; नंतर स्वत: केली आत्महत्या
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून रिक्षाचालकाने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कात्रज परिसरात घडली.
अनिता तुकाराम कोरे (वय ३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर तुकाराम गंगाराम कोरे (वय ४०, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज) असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

अल्पवयीन मतिमंद मुलीकडून एका मुलीचा खून; कोथरूडमध्ये घडली धक्कादायक घटना

याप्रकरणी कोरेची दुसरी पत्नी जगदेवी कोरे (वय ३८) हिने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुकाराम कोरे हा त्याच्या दोन पत्नींसमवेत कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात राहत होता. त्याच्या दोन्ही पत्नी या सख्ख्या बहिणी होत्या. तुकाराम कोरे हा काही दिवसांपासून अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात सातत्याने भांडणे सुरू होती. त्याच कारणावरून शुक्रवारी त्या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. त्यानंतर त्याने अनितावर कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केला. या घटनेनंतर त्याने त्याच खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)