संविधानाने दिलेला निवा-याचा हक्क हिरावता येणार नाही- मेधा पाटकर

भीमनगरमध्ये घर बचाओ, घर बनाओ आंदोलन
भीमनगर येथे जनतेशी संवाद साधताना मेधा पाटकर
भीमनगर येथे जनतेशी संवाद साधताना मेधा पाटकरsakal

कोथरुड : संविधानाची शपथ घेवून अधिकारी पदाचा स्विकार करतात. पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत. श्रमिकांच्या श्रमाचे मोल नाही आणि हक्काला दाद नाही म्हणून आम्ही घर बचाओ आणि घर बनाओ ही घोषणा दिली. संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, निवारा, रोजगार असे सर्व अधिकार दिले आहेत. हे अधिकार कोणालाही हीरावता येणार नाहीत. न्यायाच्या या लढाईत मी तुमच्या सोबत आहे असा संदेश सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी भीमनगर येथील रहीवाशांना दिला.

डीपी रस्त्याच्या विकासासाठी ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या कोथरुडमधील भीमनगर येथे सुनिती सु. र., ज्ञानेश्वर शेडगे, पूनम कनोजिया या कार्यकर्त्यांबरोबर आल्या होत्या. येथील रहीवाशांचे प्रश्न समजून घेत मेधाताईंनी संवाद साधला. लखीमपुरच्या सीमेवर शहीद झालेल्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. देवीदास ओव्हाळ, जावेद शेख, नेहा गायकवाड, मंगल कांबळे, रेश्मा पल्ला, सोनाली पोळ, वैशाली साळवे, आक्काबाई तोरडमल, सुभद्रा तोरडमल, रईसा शेख, वर्षा डेंगळे, सोजरबाई खरात आदी उपस्थित होते.

भीमनगर येथे जनतेशी संवाद साधताना मेधा पाटकर
जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरण: डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

त्यांना जर विकासकामे करायची होती तर इतके दिवस काय करत होते.जमिनीचा विकास करायचा म्हणतात. पण त्यासठी वस्तीतील लोकांची सहमती घेतली का, त्यांना नियोजन आराखडा दाखवला का असा प्रश्न उपस्थित करत मेधाताई म्हणाल्या की, लोकांना त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. दर सहा महिन्यांनी एक वार्डसभा घेणे बंधनकारक आहे. पण अशा सभा घेतल्या जात नाहीत. तुम्ही वार्डसभेसाठी आग्रही रहा. जर त्यांनी सभा घेतल्या नाहीत तर त्यांचे पद जाईल. क्षेत्रसभेमध्ये तुमचे म्हणणे मांडा.

आकाश शिंदे- कायद्यानुसार आमचे योग्य पुनर्वसन व्हायला हवे. वीज, पाणी, रस्ता, सुरक्षा भिंत, गेट, लिफ्ट आदी सुविधा नसतील तर आम्ही तेथे कसे रहायला जायचे. तेथे रहायला जा असा आमच्यावर दबाव आणला जातो. बाल तरुण मंडळ या वस्तीतील दिव्यांग असलेले संजय बनपट्टी म्हणाले की, आमची वस्ती घोषीत झोपडपट्टी आहे. आम्ही आमच्या प्रश्नासाठी अधिका-यांना वेळ मागतो पण अधिकारी आम्हाला वेळ देत नाहीत.

चांगले पुनर्वसन करण्याची संधी लोकप्रतिनिधींना आहे. त्यांनी ते करुन दाखवावे. पुनर्वसन कायद्याचे पालन करावे. आम्ही अधिकृत नाही तर आमचे मत पण घेवू नका. नवी कागदपत्रे बनवू देवू नका. कागदपत्रामध्ये फसवण्याचे कारस्थान देशामध्ये चालले आहे. कायदे बदलून टाकतात. आता रेशन बंद करणार आहे. ते खोटे आरोप लावतील पण आपण ख-याची साथ द्यायची. आपण कायदा व जुबानची लढाई लढत आहोत. आपल्याला ते खलिस्तानी, पाकिस्तानी ठरवतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com