
पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे इयत्ता आठवीसाठीची प्रवेश पात्रता परीक्षा ७ डिसेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी एक जुलै २०२६ ला मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत असणे किंवा सातवी उत्तीर्ण असणे, अशी शैक्षणिक पात्रता आहे. विद्यार्थ्यांची वयोमर्यादा एक जुलै २०२६ ला साडेअकरा वर्षांपेक्षा कमी आणि तेरा वर्षांपेक्षा अधिक नसावे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.