रिंगरोड बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही - चंद्रकांत पाटील

रिंगरोडसाठी कुणाच्याही दबावाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये देवेंद्र फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार रिंगरोडचे काम झाले पाहिजे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal
Updated on

पुणे - रिंगरोडसाठी (Ringroad) कुणाच्याही दबावाला शेतकऱ्यांनी (Farmer) बळी पडू नये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार रिंगरोडचे काम झाले पाहिजे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्‍वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

मांडवी बुद्रूक, बहुली,वरदाडे, शिवगंगा खोरे,रहाटवडे, कल्याण (हवेली), रांजे, कुसेगाव, खोपी, कांजळे, केळवडे, भोर या गावांमधील शेतकरी रिंग रोडमुळे बाधित होणार आहे. या गावाच्या सरपंच व शेतकऱ्यांनी आज चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, कैफियत मांडली.

Chandrakant Patil
महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाकवच योजनेला वाढ

रिंगरोडची प्रस्तावित आखणी बागायत क्षेत्रातून रद्द करून डोंगर पायथ्याने माळरानातून व्हावी. तसेच रस्त्यांची रुंदी ११० मीटर ऐवजी ९० मीटर व्हावी. त्यास सर्व्हिस रस्ता असला पाहिजे. तसेच बाधित शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुण सुरु असलेले जमीन अधिग्रहण थांबवून त्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी या बैठकीत शेतकऱ्यांनी केली.

त्यावर पाटील म्हणाले, '‘रिंगरोडसाठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कृती आराखडा मंजूर केला होता. पण तो आघाडी सरकारने रद्द केला. शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुण रिंगरोडची निर्मिती होणार असेल, तर भाजप त्यास विरोध करेल. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, पीएमआरडीए व एमएसआरडीसींच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com