- रवीकिरण सासवडे
काटेवाडी - पुणे जिल्ह्यात मे २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भूजल पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मागील पाच वर्षांच्या मे महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पाणीपातळी सरासरी २.३२ मीटरने वाढली आहे.