उंड्रीच्या रिशिताने नॅशनल स्पीड स्केटिंग स्पर्धेत पटकाविली २ सुवर्ण

दिल्लीमध्ये ५९ व्या नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेत हांडेवाडी रोड येथील रिशिता नारळे हिने दोन सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे
नॅशनल स्पीड स्केटिंग
नॅशनल स्पीड स्केटिंगsakal

उंड्री : दिल्लीमध्ये ५९ व्या नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेत (National Speed Skating Championship)हांडेवाडी रोड येथील रिशिता नारळे हिने दोन सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. हॅचिंग हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेमध्ये रिषिता पहिली इयत्तेत शिक्षण घेत आहे. आतापर्यंत तिने २५ सुवर्णपदके पटकाविली आहेत.

नॅशनल स्पीड स्केटिंग
पोलिस अधीक्षकांचे ऑपरेशन परिवर्तन ! तीनशे कुटुंबियांनी सोडला अवैध व्यवसाय

दिल्ली येथे १२ व १३ डिसेंबर २०२१ रोजी ५९ व्या नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियन स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये हांडेवाडी रोड येथील (रुणवाल सिगल सोसायटी) रिशिता नारळे हिने ५ ते ७ वयोगटामध्ये २ व ३ लॅप इनलाइन कॅडेट स्केटिंग स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकाविले. रिशिता हिने स्केटिंगचा सराव रुणवाल सोसायटीमध्ये केला. स्केटिंगचे प्रशिक्षक योगेश कुमावत, पी.टी. शिक्षक दीपक चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिचे वडिल योगेश नारळे यांनी तिला प्रोत्साहन मिळाले. हॅचिंग स्कूल आणि रुणवाल सोसायटीतील नागरिकांनी तिचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com