पोलिस अधीक्षकांचे ऑपरेशन परिवर्तन ! तीनशे कुटुंबियांनी सोडला अवैध व्यवसाय

तांड्यांवर तयार होणारी अवैध हातभट्टी दारु 102 गावांमध्ये विक्री
पोलिस अधीक्षक
पोलिस अधीक्षकsakal

सोलापूर : जिल्ह्यातील 56 गावांमध्ये विशेषत: तांड्यांवर तयार होणारी अवैध हातभट्टी दारु 102 गावांमध्ये विक्री केली जायची. जवळपास 600 कुटुंबियांचा हा व्यवसाय व उत्पन्नाचे साधन होते. त्याची माहिती संकलित करून 1 सप्टेंबरपासून 'ऑपरेशन परिवर्तन'च्या माध्यमातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हा व्यवसाय बंद करण्यासाठी मोहीम सुरु केली. 300 कुटुंबातील भट्ट्या लावणारे हात पर्यायी व्यवसायाकडे वळले, हे विशेष. हा पॅटर्न गृहमंत्र्यांनी राज्यभर राबविल्यास त्यातून राज्यातील अवैध व्यवसायाला आळा बसू शकतो, गुन्हेगारी कमी होईल, असे जाणकारांचे मत आहे.

आयपीएस झाल्यानंतर शिकाऊ अधिकारी म्हणून सोलापुरात काम करताना पोलिस अधीक्षक सातपुते यांना मुळेगाव तांडा हे अवैध हातभट्टी दारु तयार करणारे गाव म्हणून माहिती झाले होते. अनेक वर्षांच्या सेवेनंतर त्या सोलापूरच्या पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. तरीही, मुळेगाव तांड्याची ओळख तशीच होती. त्यानंतर त्यांनी हा अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा निश्‍चिय केला.

पोलिस अधीक्षक
राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर

यापूर्वी कारवाई होऊनही हा व्यवसाय का बंद होऊ शकत नाही, याचा अभ्यास केला. त्यानंतर हातभट्टी निर्मितीची व विक्रीच्या गावांचा आणि त्याच्याशी निगडीत कुटुंबांचीही माहिती संकलित केली. त्यांनतर त्यांनी आठवड्यातून दोनदा अशा ठिकाणी छापा टाकण्याचे नियोजन केले. त्याची जबाबदारी प्रत्येक अधिकारी व त्यांच्या पथकावर सोपविली. कारवाईत सातत्य राहिल्याने व्यवसायिकांना नफ्यापेक्षा भुर्दंड अधिक होऊ लागला. त्यामुळे आता तो व्यवसाय बंद करून पर्यायी व्यवसाय सुरु केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी भावना त्यांच्या मनात रुजली. दोन पैसे कमी मिळत असतील, पण त्यांचे कुटुंब समाधानी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

रोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्र, मिटकॉनची मदत

'कमी श्रमात अधिक दाम' हे अवैध व्यवसायाचे गणित असते. अशा व्यवसायापासून परावृत्त व्यक्‍ती पुन्हा त्याकडे वळणार नाही, त्याची पुरेपुर खबरदारी घेण्यात आली. बचत गटांच्या माध्यमातून त्या महिलांना अर्थसहाय मिळवून दिले. जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉनतर्फे महिला, तरुणींना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. 45 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना उद्योग केंद्रातर्फे रोजगाराची हमीही मिळाली. गारमेंट उद्योजकांनीही रोजगाराची ग्वाही दिली. तत्पूर्वी, अनेकांनी शिवणकाम, चपला बनविणे, कापड दुकान, पानपट्टी, किरणा दुकान, पशुपालन, कुक्‍कुटपालन, गॅरेज, मासेमारी असे व्यवसाय सुरु केले आहेत.

पोलिस अधीक्षक
सोलापुरात शरद पवारांचा "एम' फॅक्‍टर!

तो बनला उत्कृष्ट पेढेवाला

लॉकडाउनमध्ये गावी आलेला एक तरुण उत्कृष्ट पेढे तयार करीत होता. परंतु, लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने त्याच्या हाताला कामधंदा नव्हता. त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला हातभट्टी दारु निर्मितीचे धडे दिले आणि पेढे बनविणारे हात अवैध व्यवसायाकडे वळले. परंतु, पोलिसांची सततची कारवाई आणि त्यातून कुटुंबियांची होणारी वाताहत, त्या बघवत नव्हती. पोलिस अधीक्षकांनी समपुदेशन केल्यानंतर त्याने पुन्हा पेढे बनविण्याचा व्यवसाय सुरु केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com