pune airport area construction
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - पुणे विमानतळ आणि हवाई दलाच्या परिसराभोवती शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, या भागात इमारती व व्यावसायिक बांधकामांचे प्रमाणही वाढत आहे. हवाई सुरक्षेच्या दृष्टीने बांधकामासाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) येणाऱ्या अर्जांची संख्या गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढली आहे. २०२० मध्ये १ हजार ६२ अर्ज आले होते. ही संख्या २०२५ मध्ये १ हजार ४०८ वर पोहोचली आहे. मात्र, अधिकृत बांधकामांसोबतच नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे हवाई सुरक्षेचा प्रश्नही गंभीर होत आहे.