
सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू असून, उपमुख्यमंत्री पवार सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे पवार या आढावा बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सल्लामसलत करून निर्बंध लागू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू असून, उपमुख्यमंत्री पवार सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे पवार या आढावा बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. कोरोनाच्या नवीन लाटेत काय परिस्थिती असेल, याबाबत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांनी अभ्यास केला आहे. त्यानुसार रूग्णसंख्येत वाढ झाली असली तरी तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. ही रुग्णसंख्या आणखी कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा शास्त्रोक्त अहवाल मागविण्यात आल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले होते. हा अहवाल या बैठकीत सादर होण्याची शक्यता आहे.
- सोनं खरेदी करण्याचा गोल्डन चान्स ते आमच्या पुण्यात सगळंच भारी; वाचा एका क्लिकवर
शाळा आणि महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यानंतर आता लग्न समारंभाच्या आयोजनावर निर्बंध, बिअर बार बंद करणे तसेच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू ठेवणे अशा पर्यायांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पोलिस आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
- मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला